शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 (14:24 IST)

New Year 2022: गोव्यात नवीन वर्ष साजरे करा, पर्यटकांसाठी या पाच गोष्टी विनामूल्य आहेत

नवीन वर्ष येणार आहे. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जी नवीन वर्ष साजरे करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी नवीन वर्षाच्या निमित्ताने पार्ट्या, अनेक प्रकारचे कार्यक्रम आणि धमाल केली जाते. नववर्षाच्या पूर्वसंध्येला अनेकजण घराबाहेर पडतात. त्यांना वर्षाच्या पहिल्या दिवसाचे त्याच्या कुटुंबासह, मित्रांसोबत किंवा जोडीदारासह  दणक्यात नवीन वर्षाचे स्वागत करायचे आहे. या नववर्ष सेलिब्रेशनसाठी प्रसिद्ध शहरांमध्ये गोव्याचे नाव समाविष्ट आहे. गोव्यात नवीन वर्ष साजरे करण्यासाठी देशभरातून लोक येतात. गोवा सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. पण याच बीचवर नववर्षाच्या पूर्वसंध्येला पार्टीचे आयोजन करण्यात येते . नाच गाणे, चविष्ट खाद्यपदार्थ आणि पेयांसह गोव्याची पार्टी शानदार असते. त्याचबरोबर नवीन वर्षाच्या निमित्ताने गोव्यात लोकांना पाच गोष्टी मोफत देखील मिळतात. चला तर मग यंदाचे नवीन वर्ष गोव्यात घालवू या आणि जाणून घ्या की गोव्यात पर्यटकांसाठी काय मोफत आहे ते.
 
1 गोवा किल्ला मोफत फिरा - समुद्राव्यतिरिक्त गोवा किल्ल्यासाठीही प्रसिद्ध आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आपण गोव्याच्या किल्ल्यालाही भेट देऊ शकता. येथे चापोरा किल्ला, तिराकल किल्ला, कॉरजुम किल्ला, रेस मागोस किल्ला, मॉर्मुगाव किल्ला या ठिकाणी जाता येते. हे अडव्हेंचर्स साठी योग्य आहेत. 
 
2 गोव्याचे चर्च - गोव्यात अनेक ऐतिहासिक चर्च आहेत. देशातील सर्वात जुने चर्च, बॉम जीझस, हे देखील गोव्यात आहे. गोव्यातील सी कॅथेड्रल, चर्च ऑफ सेंट फ्रान्सिस, चर्च ऑफ सेंट सेजेटन, मै डी डीयस चर्च येथे आपण भेट देऊ शकता आणि विनामूल्य फिरू शकता.
 
3 गोव्याच्या धबधब्याला मोफत भेट द्या - गोव्याच्या समुद्रकिना-याशिवाय इथल्या धबधब्यातही आपण फ्रेश होऊ शकता. गोव्यातील दूध सागर धबधब्यावर आपण निसर्गाचा आनंद मोफत अनुभवू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता. 
 
4 गोव्याची मोफत नाईट क्लब पार्टी -गोवा रात्रीच्या पार्टीसाठीही प्रसिद्ध आहे. आपण येथे नाईट क्लब पार्ट्यांचा मोफत आनंद घेऊ शकता. संध्याकाळी समुद्रकिनारी वाळूवर या पार्ट्या होतात. येथे आपण बागा, पालोलम, अरंबोल बीच येथे रात्रीच्या पार्टीचा आनंद घेऊ शकता.
 
5 गोव्यात मोफत ट्रेकिंग - गोवा खूप सुंदर आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य आपल्याला  मोहून टाकेल. या सौंदर्यात आपण दूधसागरजवळील मोलेम नॅशनल पार्कमध्ये फिरू शकता. इथल्या जंगलांच्या भव्य दृश्याचा आनंद घेऊ शकता. भगवान महावीर वन्यजीव अभयारण्यातून ट्रेकिंग करून कृष्णपूर व्हॅलीलाही भेट देऊ शकता.