सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : बुधवार, 6 सप्टेंबर 2023 (11:09 IST)

Trinetra Ganesh Temple Ranthambore : त्रिनेत्र गणेश मंदिर रणथंबोर माहिती

Trinetra ganesh temple
Trinetra Ganesh Temple Ranthambore त्रिनेत्र गणेश मंदिर रणथंबोर किल्ल्यात आहे. राजस्थानात देश-विदेशातील भाविक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आवर्जून येतात, ज्यांच्यावर राजस्थानसह देशातील इतर भागातील भाविकांची अतूट श्रद्धा आहे. हजारो वर्षे जुने हे मंदिर राजा हमीर देव यांनी बांधले होते. गणेश चतुर्थीच्या दिवशी हजारो भाविक त्रिनेत्र गणेशाच्या दर्शनासाठी मंदिरात येतात.
 
त्रिनेत्र गणेश मंदिर राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील विंध्याचल आणि अरवली डोंगराच्या मधोमध वसलेले आहे, देश-विदेशातील लोकांच्या श्रद्धेचे मुख्य केंद्र असलेला रणथंबोर किल्ल्यात आहे.
 
त्रिनेत्र गणेश मंदिराचा इतिहास -
रणथंबोरचा राजा हमीरदेव चौहान याचे दिल्लीचा शासक अलाउद्दीन खिलजीशी युद्ध सुरु होते. युद्ध बराच काळ चालल्यामुळे राजा हमीर देव याला आवश्यक असलेल्या गोष्टी हळूहळू संपत होत्या, म्हणून राजा हमीर देव यांनी भगवान गणेशाला आळवले आणि युद्ध लवकर सम्पस्थत  जेणेकरून अल्लाउद्दीन खिलजीसोबतचे त्यांचे युद्ध लवकर संपुष्टात यावे आणि त्यांच्या राज्यात कसलीही कमतरता भासू नये. अशी इच्छा केली.
 
त्याच रात्री गणपती राजा हमीर देव यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी आश्वासन दिले की युद्ध लवकरच संपेल आणि त्याच रात्री रणथंबोर किल्ल्याच्या भिंतीवर गणेशजींची तीन डोळ्यांची मूर्तीची स्थापना केली गेली. युद्ध संपल्यानंतर लगेचच राजा हमीर देव याने विंध्याचल आणि अरावलीच्या टेकड्यांमध्ये गणेशाची मूर्ती स्थापित केली आणि 1579 फूट उंच असलेल्या मंदिराचे बांधकाम केले. 
 
जगातील हे एकमेव मंदिर आहे जिथे तीन डोळ्यांची गणेशाची मूर्ती आहे. त्रिनेत्र गणेश मंदिरात गणेशजींची पत्नी रिद्धी-सिद्धी आणि त्यांची मुलं शुभ-लाभ यांचीही मूर्ती आहे. तसेच या मंदिरात गणेशजींचे वाहन असलेले मूषकराज देखील आहे.
 
रणथंबोरच्या त्रिनेत्र गणेश मंदिरात दररोज 10 ते 15 किलो पत्रे येतात, ज्यामध्ये लग्न, नोकरी, पदोन्नती आणि भरती तसेच घरातील इतर समस्यांवरून कर्ज घेण्याबाबत लिहिलेले असते. असे म्हणतात की त्रिनेत्र गणपती आपल्या भाविकांच्या सर्व समस्या ऐकतात आणि त्या समस्या दूर करतात. म्हणून भाविक त्यांना पत्र पाठवून आपल्या समस्या सांगतात. 
 
 बहुतेक लोक हे पत्र गणेशजींच्या मंदिरात पोस्ट ऑफिसमधून पाठवतात आणि दररोज 10 ते  15 किलो पत्र येतात. भाविकांची ही पत्र दररोज एक पोस्टमन 5 किमीची चढण चढून गणेश मंदिरा पर्यंत पोहोचतो. पोस्टमनने पत्र मंदिरात पोहोचवल्यानंतर, ती सर्व पत्रे पुजारी वाचून गणेशजींना ऐकवतात. प्राचीन काळापासून अशी आख्यायिका आहे की असे केल्याने घरातील सर्व संकटे दूर होतात.
 
त्रिनेत्र गणेश मंदिराचा पिन कोड -
रणथंबोर किल्ल्यामध्ये स्थापन केलेल्या त्रिनेत्र गणेश मंदिराचा पिन कोड 322021 आहे, जेणेकरून भाविकांना त्यांची पत्रे पोस्ट ऑफिसद्वारे सहजपणे त्रिनेत्र गणेश मंदिरात पोहोचवता येतील.
 
त्रिनेत्र गणेश मंदिरात कसे जायचे?
त्रिनेत्र गणेश मंदिर सवाई माधोपूर जिल्ह्यात आहे, जे देशाच्या इतर भागातून ट्रेन आणि बसने पोहोचणे अगदी सोपे आहे.
 
विमानाने- रणथंबोर येथील त्रिनेत्र गणेश मंदिरासाठी सर्वात जवळचे विमानतळ जयपूरमध्ये आहे, जे या मंदिरापासून सुमारे किमी अंतरावर आहे. अंतरावर स्थित आहे. जयपूर विमानतळावरून तुम्ही बस किंवा ट्रेनने सवाई माधोपूरला पोहोचू शकता आणि तिथून तुम्हाला त्रिनेत्र गणेश मंदिरात जाण्यासाठी कॅबची सुविधा उपलब्ध आहे, जिथून तुम्ही मंदिरात सहज पोहोचू शकता.
 
रेल्वेने-सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन सवाई माधोपूर आहे, जिथे तुम्ही देशातील प्रमुख शहरांमधून ट्रेनने आणि तेथून कॅबने त्रिनेत्र गणेश मंदिरापर्यंत पोहोचू शकता.
 
बसने-सर्वात जवळचे बसस्थानक सवाई माधोपूर आहे, जिथे राजस्थानच्या इतर भागातून येण्यासाठी नियमित बसेस धावतात.