सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : मंगळवार, 19 मार्च 2024 (10:18 IST)

धुळवडसाठी मथुरा आणि वृंदावनला ट्रिप प्लॅनींग करताय, लक्ष ठेवा या गोष्टींकडे

holi kashi mathura
होळी, धुळवडचा सण देशभरात साजरा केला जातो. पण उत्तरप्रदेशच्या ब्रजमध्ये या सणाचा एक वेगळाच उत्सव पहायला मिळतो. मथुरा, वृंदावन, गोवर्धन, गोकुळ, नंदगांव आणि बरसाना मध्ये खूप उत्साहात धुळवड साजरी केली जाते. तसेच लोक दुरून दुरून येथे रंग खेळायला येतात. या वेळेस मथुरा-वृंदावन मध्ये रंग खेळायचा प्लॅनींग करत असाल तर काही गोष्टींची काळजी घ्यावी. 
  
योग्य दिवस निवडा-  
जर तुम्हाला वृंदावनची खरी धुळवड पहायची असेल तर रंगभरी एकादशीला येथे जरूर जा. या दिवशी खूप उत्साहात प्रत्येक गल्लीमध्ये धुळवड सण साजरा केला जातो. इथे गुलालच नाही तर पाणी असलेले रंग देखील लोक खेळतांना दिसतील.  
 
पहिल्यापासूनच करा बुकिंग-     
ब्रजमध्ये धुळवडला दुरून दुरून लोक येतात. जर तुम्ही जायचे प्लॅनींग करत असाल तर आपल्या हॉटेलची बुकिंग आधीच करून घ्या, असे देखील होऊ शकते गर्दीमुळे हॉटेल मध्ये जागा नसावी.  
 
कपड्यांची काळजी घ्या-    
धुळवड खेळतांना आपल्या कपड्यांचे खास लक्ष ठेवावे. जर तुमचे कपडे मऊ, आरामदायी नसतील तर गर्दीच्या ठिकाणी तुम्हाला समस्या निर्माण होईल. 
 
खायच्या वस्तु सोबत घेऊन जा-      
धुळवड मुळे कदाचित तुम्हाला हॉटेलमध्ये रांगेत उभे राहवे लागेल. म्हणून काळजी पूर्वक खायच्या वस्तु सोबत घेऊन जा. 
 
महागातल्या वस्तु घेऊन जाऊ नका सोबत-   
बज्रच्या धुळवड मध्ये लोक दुरून दुरून येतात. तसेच मंदिरामध्ये खूप गर्दी असते. म्हणून प्रयत्न करा की, सोबत महाग वस्तु घेऊन निघू नका. जर सोन्याच्या वस्तु घातल्या असतील तर त्या काढून ठेवा मग जा. 

Edited By- Dhanashri Naik