1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. बॉयोग्राफी
Written By
Last Modified: मंगळवार, 9 मे 2023 (10:25 IST)

Death anniversary कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी

bhau rao patil
social media
गरीबांच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवणारे, बहुजनांच्या शिक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य झिजवणारे, शिक्षण महर्षी, शिक्षणाचे महामेरू, शिक्षण प्रसारक, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर समाजसुधारक, पद्मभूषण, कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम आणि विनम्र अभिवादन..!
 
कर्मवीर भाऊराव पाटील यांंची माहिती
-कर्मवीर भाऊराव यांचे पू्र्ण नाव भाऊराव पायगौंडा पाटील असे होते.
 
-भाऊराव पाटील हे जन्माने जैन होते. मात्र जनतेमध्ये ते इतके मिसळून गेले की संपूर्ण बहूजन समाजाला ते आपले वाटले.
 
-महात्मा फूले यांच्या सत्यशोधकी विचारांचा प्रभाव भाऊराव पाटलांवर होता. आपल्या जीवनातील मोठा काळ ते सुद्धा सत्यशोधक समाजाचे सदस्य होते.
 
-शिक्षणाची चळवळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांंनी 1935  मध्ये महात्मा फुले अध्यापक विद्यालय सुरु केले होते.
 
-अस्पृश्यता मिटवण्यासाठी त्यांंनी बालपणापासुन काम केले होते, याचे उदाहरण म्हणजे, लहानपणी अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नसल्याचे कळताच त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता.
 
- भाऊराव यांंनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी 'कमवा व शिका' हि योजना सुरु केली.
 
- ऑक्टोबर 4, 1919 रोजी भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली.
 
-रयत शिक्षण संस्था ही आशिया खंंडातील सर्वात मोठी संंस्था असुन महाराष्ट्रात 4 जिल्ह्यात व कर्नाटक मध्ये मिळून याच्या 675 शाखा आहेत.
 
- भाऊराव पाटील यांनी साताऱ्यात एक वसतिगृह स्थापन केले होती ज्यासाठी त्यांंनी पत्नीचे मंगळसूत्र व दागिनेही विकले होते, त्यांंच्या पत्नीचा सुद्धा या कामात मोठा पाठिंंबा होता.
 
- पुणे विद्यापीठाने भाऊराव यांंना 1959 मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी बहाल केली होती.
 
- भाऊराव पाटील यांंना भारतीय सर्वोच्च पुरस्कारांंपैकी एक असा पद्मभुषण सुद्धा प्राप्त आहे.
 
-9 मे 1959 रोजी भाऊराव यांंचे निधन झाले.