सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. बॉयोग्राफी
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जानेवारी 2024 (11:00 IST)

चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर यांची माहिती

Yashwantrao Holkar
social media
चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर हे होळकर साम्राज्याचे महाराजा होते. तसेच ते सम्राट ( प्रथम ) होते. महाराज यशवंतराव होळकर यांचा जन्म 3 डिसेंबर 1776 वाफगाव, ता. खेड, जि. पुणे येथे झाला. ते होळकर साम्राज्याचे कर्तृत्ववान महाराजा होते. मध्य प्रदेश येथील महेश्वर येथे 6 जानेवारी 1805 साली राज्याभिषेक करून त्यांनी होळकर मराठा साम्राज्याची स्थापना केली. आणि ते पाहिले चक्रवर्ती महाराजा झाले. महाराजा यशवंतराव होळकर यांना राजराजेश्वर,महाराजधिराज, चक्रवर्ती  ह्या पदव्या दिल्या गेल्या . चक्रवर्ती यशवंतराव होळकर यांच्या वडिलांचे नाव सुभेदार तुकोजीराव होळकर (प्रथम ) हे होते.

तसेच त्यांच्या आई चे नाव यमुनाबाई होळकर होते. लाडाबाई , कृष्णाबाई , तुलसाबाई  या चक्रवर्ती यशवंतराव होळकर यांच्या पत्नी होत्या. तसेच काशीराव ,मल्हारराव, विठोजीराव हे त्यांचे थोरले बंधू होते. चक्रवर्ती यशवंतराव होळकर हे एक कर्तृत्ववान योद्धा होते. त्यांच्या पराक्रमाची चुणूक 1795 रोजी झालेल्या युद्धात दिसली. या युद्धात चक्रवर्ती यशवंतराव होळकर हे आपले पिता तुकोजीराव यांच्या सोबत दहा हजार सैन्यासोबत सामील झाले होते. त्या वेळी ते अवघे 19 वर्षाचे होते. या युद्धात त्यांनी निजामचा पराभव केला. त्यानंतर चक्रवर्ती यशवंतराव होळकर यांनी इंग्रजां विरुद्धा 18 युद्ध जिंकली त्यांनी आपल्या कर्तुत्वाने जागतिक इतिहास रचला. इंग्रजां विरुद्ध एक ही युद्धात अपयशी झाले नाही.

म्हणून त्यांना महाराजा ही पदवी देण्यात आली. त्यामुळे इंग्रज इतिहासकार मालकम हा होळकरांचा कट्टर शत्रु होता. भारतवर्षात आपली हूकूमशाही चालवणाऱ्या इंग्रज सैन्याचा नकाशा चक्रवर्ती यशवंतराव होळकर यांनीच उतरवला होता. शेवट पर्यन्त इंग्रजांची फ़ौज न स्वीकरणारे एकमेव चक्रवर्ती यशवंतराव होळकर यांना इंग्रज शत्रु मानायचे. तसेच , मराठेशाहीच्या अती विपन्नावस्थेच्या  काळात चक्रवर्ती यशवंतराव होळकर हे एक फार तेजस्वी राजा होते. चक्रवर्ती यशवंतराव होळकर यांचे मन खुप उदार होते तसेच ते गरिबांचे वालीच होते. ते आपल्या हाता खालच्या मंडळींना स्वतःच्या जीवापलीकडे जपत असायचे. त्यांनी कधीच स्वतःच्या सुखाचा विचार केला नाही.  त्यामुळेच चक्रवर्ती यशवंतराव होळकर यांचे चरित्र खुप मोठे  आहे. 

1798 मध्ये चक्रवर्ती यशवंतराव होळकर यांनी शेविलिअर दुदरेसाच्या सैन्याचा पराभव केला व मध्य प्रदेश येथील खरगोन जिल्ह्यातील महेश्वर हे आपल्या ताब्यात घेतले. त्यांचा हिन्दू वैदिक पद्धतीनुसार राज्याभिषेक झाला. त्यानंतर 4 जुलै1801 रोजी चक्रवर्ती यशवंतराव होळकर यांनी सिंधिया यांची राजधानी उज्जैनवर हल्ला चढवला तसेच जॉन हेसिंगच्या सोबत सिंधियाच्या   सैन्याचा पराभव केला. हे सिंधियासाठी अतिशय लाजिरवाणा पराभव होता. त्यानंतर चक्रवर्ती यशवंतराव होळकर यांनी मे 1802 मध्ये पुण्याकडे कूच केली. 25 ऑक्टोबर 1802 मध्ये चक्रवर्ती यशवंतराव होळकर यांनी पुण्यातील हड़पसर येथे सिंधिया  आणि पेशवे यांच्या संयुक्त सैन्यांचा पराभव केला.

हे युद्ध घोरपडी, बनवड़ी, हड़पसर येथे झाले . युद्ध जिंकताच चक्रवर्ती यशवंतराव होळकर यांनी आपल्या सैन्याला आदेश दिले की पुण्यातील नागरिकांचे नुकसान करायचे नाही.  पेशव्यांच्या उड्डाणामुळे चक्रवर्ती यशवंतराव होळकर यांनी मराठा राज्याचे सरकार हाती घेतले. चक्रवर्ती यशवंतराव होळकर हे खुप शूर,हुशार,कर्तृत्ववान,धाडसी आणि महत्वकांक्षी होते. चक्रवर्ती यशवंतराव होळकर यांनी इंग्रजां विरुद्ध एकत्रित होवून लढण्यासाठी वेगवेगळ्या राजांना पत्र लिहली की, तुम्हीही सर्वानी माझ्या प्रमाणे इंग्रजां विरुद्ध लढायला हवे. चक्रवर्ती यशवंतराव होळकर यांचे म्हणणे इतर राजांनी दुर्लक्षित  केले. कारण त्या सर्व राजांचा करार इंग्रजांसोबत झाला होता. म्हणूनच नंतर चक्रवर्ती यशवंतराव होळकर यांनी स्वबळावर इंग्रजां विरुद्ध लढायचा निर्णय घेतला.

त्यानंतर 8 जूलै 1804 रोजी कोटा व मुकुंदरे येथील कर्नल ल्यूकान आणि मॅनसन यांच्या सैन्याचा पराभव केला. चक्रवर्ती यशवंतराव होळकर यांनी आपल्या तेजस्वी कर्तुत्वाने अनेक युद्धे जिंकली . असे या थोर, तेजस्वी, बलाढ्य कर्तृत्ववान चक्रवर्ती महाराज यशवंतराव होळकर हे 28 ऑक्टोबर  1811 रोजी  भानपुर मध्य प्रदेश येथे अनंतात विलीन झाले. चक्रवर्ती यशवंतराव होळकर यांची देशभक्ति खुप थोर होती. आजही इतिहास त्यांच्या तेजस्वी कर्तृत्वाचा साक्षीदार आहे.