प्रतिभावंत साहित्यकार शिवराम महादेव परांजपे
मराठीचे एक प्रतिभावान मराठी साहित्यकार,उपरोधी शैलीचे लेखक, झुंझार पत्रकार प्रख्यात राजकारणी शिवराम महादेव परांजपे यांचा जन्म 27 जून 1864 रोजी महाड येथे झाला.त्यांचे प्रारंभिक शिक्षण महाड, रत्नागिरी आणि पुणे येथे झाले.
डेक्कन महाविद्यालयातून त्यांनी एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण केली.त्यांना ''भगवानदास ''आणि ''झाला वेदांत'' पुरस्काराने गौरविण्यात आले.त्यानंतर त्यांची पुणे येथील महाराष्ट्र महाविद्यालयात संस्कृत प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली.
जेव्हा देशाचे वातावरण तापले होते तेव्हा त्यांनी जनमानसात देशभक्तीची ज्वाला पेटविली आणि 'काळ' आणि 'स्वराज्य' नावाची साप्ताहिक वृत्तपत्रे काढली.ही वृत्तपत्रे जनमानसाच्या मनात देशभक्ती आणणारी होती.
ब्रिटिशांविरुद्ध जनजागृती करण्यात त्यांना यश आले. या साठी त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला लागला आणि त्यांना 19 महिन्याचा तुरुंगवासाच्या सामोरी जावे लागले. तुरुंगातून सुटका झाल्यावर ते गांधीजींचे समर्थक झाले.त्यांनी आपले आयुष्य ललित वाङ्मय, न्याय, ज्ञानशास्त्र,मराठा युद्धे,शूद्रांची व्युत्पत्ती अशा अनेक विषयांवर लिहिले. त्यांची व्यंगात्मक शैली प्रभावी होती.ते मराठीचे गद्यकवी होते.
'काळातील' प्रक्षोभक लेखनामुळे त्यांना 'काळकर्ते' म्हणून संबोधले.फर्डे वक्ते असणारे शिवराम आपल्या अस्खलित भाषणांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करायचे.त्यांना त्यांच्या उत्कृष्ट कारकिर्दीमुळे बेळगावच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून नेमले. 27 सप्टेंबर1929 रोजी त्यांचे निधन झाले.
परांजपें यांनी सुमारे एक हजार राजकीय आणि सामाजिक लेख, लघुकथा, कादंबऱ्या आणि नाटके लिहिली आहे.ते खालील प्रमाणे आहे.
* काळातील आणि स्वराज्यातील निवडक निबंध (निबंध संग्रह 11 भागांमध्ये )
* मानाजीराव (नाटके)
* पहिला पांडव(नाटके)
* संगीत (कादंबरी)
* गोविंदाची गोष्ट(कादंबरी)
* विंध्याचल (कादंबरी )
रामायणातील काही विचार,मराठ्यांच्या लढायांचा इतिहास,ग्रंथ संपदा इत्यादी.