बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. जन्मदिवस आणि ज्योतिष
Written By वेबदुनिया|

आज तुमचा वाढदिवस आहे (20.03.2018)

ज्या लोकांचा वाढदिवस 20 तारखेला झाला आहे त्यांचा मूलक 2 असेल. या मूलकाला चंद्र ग्रह संचलित करतो. चंद्र ग्रह मनाचा कारक असतो. तुम्ही फारच भावुक असता. तुम्ही स्वभावाने शक्की असता. दुसर्‍यांच्या दुःखाने तुम्हाला त्रास होणे ही तुमची कमजोरी आहे. तुम्ही मानसिक रूपेण स्वस्थ असता पण शारीरिक रूपाने कमजोर असता. 

चंद्र ग्रहाला स्त्री ग्रह मानण्यात आले आहे. म्हणून तुम्ही अत्यंत नरम स्वभावाचे असता. तुमच्यात नाममात्राचा अभिमान नसतो. चंद्राप्रमाणे तुमच्या स्वभावात चढ-उतार येत असतो. जर तुम्ही तुमच्या घाईगडबडीच्या स्वभावावर संयम ठेवले तर तुम्ही फार यशस्वी व्हाल.

शुभ दिनांक : 2, 11, 20, 29

शुभ अंक : 2, 11, 20, 29, 56, 65, 92

शुभ वर्ष : 2027, 2029, 2036

ईष्टदेव : महादेव, भैरव

शुभ रंग : पांढरा, फिकट निळा, सिल्वर ग्रे

हे वर्ष कसे जाईल
ज्यांची जन्म तारीख 2,11,20,29 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष अतिउत्तम राहणार आहे. एखाद्या महत्त्वपूर्ण कार्यात यश मिळेल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. विद्यार्थी वर्गाला यश मिळेल. नोकरी-व्यवसाय कारणार्‍या व्यक्तींसाठी हे वर्ष प्रगतीकारक असेल. मानसिक सुख-शांती मिळेल. शुभ वार्ता कानी पडेल. शत्रू निष्प्रभावी होतील. बेरोजगारांना रोजगार मिळेल. व्यापारी वर्ग अनुकूल स्थितीत राहतील. दांपत्य जीवन सुखमय राहील.

मूलांक 2च्या प्रभावातील विशेष व्यक्ती
* हिटलर
* अमिताभ बच्चन
* महात्मा गांधी
* ‍लाल बहादूर शास्त्री
* थॉमस अल्वा एडिसन