शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीएमसी चुनाव 2022
Written By
Last Modified: बुधवार, 1 जून 2022 (21:53 IST)

रामदास आठवले यांनी शिवसेनेवर काव्यमय टीका केली-शिवसेनेने दिला आहे आपल्याला धोका ...

Ramdas Athawale
शिवसेनेने दिला आहे आपल्याला धोका म्हणून आगामी निवडणुकीत शिवसेनेला रोखा, असे काव्यमय आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी केले. पवई येथे ईशान्य मुंबई जिल्हा रिपाइंच्या कार्यकर्ता मेळाव्यात रामदास आठवले बोलत होते.

रामदास आठवले यांनी शिवसेनेवर काव्यमय टीका केली आहे. ते म्हणाले की, शिवसेनेने दिला आहे आपल्याला धोका म्हणून आगामी निवडणुकीत शिवसेनेला रोखा, असे म्हणत मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आपले एकही मत वाया घालवू नका, असे आवाहन आठवलेंनी केले आहे.
 
महाविकास आघाडी सरकार हे दलितविरोधी आहे. अनुसूचित जाती जमातीचे पदोन्नतीमधील आरक्षण, नोकरी मधील मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढला जात नाही. मागासवर्गीयांबाबत महाविकास आघाडी सरकार निर्णय घेत नाही, असा आरोप आठवले यांनी केला आहे.
 
रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदावर 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. अशा पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून पदाचा राजीनामा देऊन नव्यांना संधी द्यावी आणि पक्षात वरिष्ठ पदावर काम करावे. मी कुणालाही पदावरून काढत नाही. पण, एकाच पदावर दीर्घकाळ राहिलेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष हिताचा विचार करून पक्ष संघटनेचे काम करावे, असे आवाहनही रामदास आठवले यांनी केले.