मुंबई मनपात शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे संकेत सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यानंतर युतीची चर्चा

supriya sule
Last Modified गुरूवार, 19 मे 2022 (07:38 IST)
ज्या जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे त्या ठिकाणी निवडणुका घेण्यास काय हरकत आहे? असा सवाल करून जिल्हानिहाय आढावा घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. दुसरीकडे धुळ्यात सुप्रिया सुळे यांनी मुंबई महापालिकेत

शिवसेनेची सत्ता येणार असल्याचे वक्तव्य केले. यामुळे मुंबई मनपा निवडणुकीचे पडघम वाजत असतांना शिवसेना राष्ट्रवादीची मनपात युती होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे मंगळवारी म्हटलं की, मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता येईल. यामुळे मनपात शिवसेनेचा महापौर असणार आहे. कोरोना काळामध्ये मुंबई मनपाने केलेल्या कामगिरीमुळे शिवसेनाच सत्तेत येईल.
शिवसेना आणि राष्ट्रवादी युती ?

सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यानंतर मुंबई महापालिकेत शिवसेना-राष्ट्रवादी युती होणार का? असी चर्चा सुरु आहे. मनपात एकूण 236 वॉर्ड आहेत. बहुमतासाठी 114 जागांची गरज आहे. गेल्या 25 वर्षांपासून मनपात सत्तेत असणाऱ्या शिवसेनाला मागील निवडणुकीत स्वळावर सत्ता मिळवता आली नाही. शिवसेनेचे 97 नगरसेवक निवडून आले तर राष्ट्रवादीचे आठ नगरसेवक आहेत. युती झाली तर शिवसेना 180 ते 190 जागांवर निवडणुका लढवणार तर राष्ट्रवादी 40 ते 50 जागांवर लढवेल. मुंबईत राष्ट्रवादीचा फारसा प्रभाव नसल्याने अमराठी जागा राष्ट्रवादीला देण्यावर शिवसेनेचा भर असेल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्यामुळे मुस्लीमबहुल भागामध्ये शिवसेनेला फायदा होऊ शकतो. दोन्ही पक्ष एकत्र आली तर विविध विकासाच्या आणि राजकीय मुद्द्यांवर देखील स्थानिक पातळीवर भाजप तसेच इतर मित्रपक्षांना शह देता येईल, असा देखील राजकीय जाणकार सांगतात.
मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल

शिवसेना – 97

भाजप – 83

काँग्रेस – 29

राष्ट्रवादी – 8

समाजवादी पक्ष – 6

मनसे – 1

एमआयएम – 2

अभासे – 1

एकूण – 227

बहुमताचा आकडा – 114


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

घराबाहेर अंगणात झोपलेल्या युवकावर बिबट्याचा हल्ला

घराबाहेर अंगणात झोपलेल्या युवकावर बिबट्याचा हल्ला
पस्तीस वर्षीय युवकाने आलेल्या काळावर मात करीत अक्षरश: बिबटयाशी झुंज दिल्याचा प्रक्रार ...

तृणनाशक प्राशन करून शिक्षकाची आत्महत्या

तृणनाशक प्राशन करून शिक्षकाची आत्महत्या
सावंतवाडी :तृणनाशक पिऊन शिक्षकाने आत्महत्या केल्याचा प्रकार सावंतवाडी शहरात घडला. शहरातील ...

Donald Trump FBI Search : तिजोरीचे उल्लंघन केल्याचा आरोप ...

Donald Trump FBI Search : तिजोरीचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील घरावर एफबीआयने छापा टाकला
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांच्या निवासस्थानावर छापा टाकल्याची ...

“संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढणार”

“संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढणार”
संजय राऊत सध्या कोठडीत असताना भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर आणखी गंभीर ...

August Revolution Day : 9 ऑगस्ट : स्मरण ऑगस्ट क्रांतिदिनाचे

August Revolution Day : 9 ऑगस्ट : स्मरण ऑगस्ट क्रांतिदिनाचे
दुसर्‍या महायुद्धात पाठिंबा घेऊनसुद्धा ब्रिटिशांनी भारताला स्वातंर्त्य दिले नाही, तेव्हा ...