सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीएमसी चुनाव 2022
Written By
Last Modified: सोमवार, 9 मे 2022 (11:59 IST)

मुंबई महापालिकेत तब्बल 23 हजार पदे रिक्त

मुंबई- मुंबई महापालिकेत रिक्त पदांमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होताना दिसत नाही. मुंबई पालिकेत एकूण पदे आणि प्रत्यक्ष मनुष्यबळाची पडताळणी केल्यास रिक्त पदे अधिक असल्याचे दिसून येत आहे. मुंबई पालिकेत एका लाख 20 हजार पदे मंजूर असून, नियमित भरती आणि कंत्राटी पद्धतीने आस्थापना अनुसूचीवर प्रत्यक्ष कार्यरत पदे 97 हजार आहेत. त्यामुळे सध्या सुमारे 23 हजार पदे रिक्त आहेत.
 
मुंबई पालिकेत रिक्त पदांमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. पालिकेच्या आस्थापना अनुसूचीप्रमाणे प्रशासकीय अधिकारी संवर्गाची एकूण 348 पदे असून, त्यातील 25 पदे (7 टक्के), मुख्य लिपिक संवर्गातील एकूण 1280 पदांपैकी 213 (17 टक्के) पदे रिक्त आहेत. त्यामुळे पालिकेच्या दैनंदिन कामकाजासह आस्थापना, प्रशासकीय कामकाज खोळंबत असल्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
 
मुंबई पालिकेत अनेक वर्षे विविध विभागातील पदे रिक्त आहे. त्या पदांवर भरती होत नाहीये. परिणामस्वरुप मुंबईकरांना मिळणाऱ्या सेवांवरही होत असल्याचे कामगार संघटनांचे म्हणणे आहे. पालिका प्रशासनाने ही पदे भरण्याचे आश्वासन दिले असले, तरीही त्याची पूर्तता होत नसल्याचा आक्षेप घेतला जात आहे.