1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 20 एप्रिल 2022 (22:06 IST)

भोंग्यांबाबत मुंबई महापालिकेने काढले हे महत्वाचे आदेश

mumbai mahapalika
भोंगे लाऊडस्पीकर संदर्भात मुंबई पोलिसांनी अतिशय महत्त्वाचे आदेश काढले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भोंग्यांवरुन राज्यभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांचा विषय उपस्थित केला आहे. आता मुंबई पोलिसांनी आदेश काढले आहेत की, मुंबईमध्ये रा६ी 10ते सकाळी 6 पर्यंत लाऊडस्पीकर वाजवता येणार नाहीत.
 
मुंबई पोलिसांच्या आदेशानुसार, लाऊडस्पीकर किंवा भोंगे लावण्यास शांतता क्षेत्रामध्ये परवानगी नाही. तसे, रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत कुणालाही लाऊडस्पीकर किंवा भोंगे वाजविता येणार नाहीत. या आदेशाचे उल्लंघन केले तर संबंधितांर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक किंवा कुठल्याही स्वरुपाचा कार्यक्रम असेल तरी भोंगे किंवा लाऊडस्पीकरला रात्री परवानगी नसेल.या आदेशामुळे पहाटेच्या सुमारास सुरू असणारे भोंगे आता बंद राहणार आहेत.