देशी जुगाड :सामानाच्या जागी माणूस ; फोटो व्हायरल !
मुंबईच्या तुफान गर्दी प्रवास करणे सर्वांचा बस चे नाही. त्यातून लांबचा प्रवास असेल आणि बसायला जागाच नसल्यास तर काही लोक अद्दल लावतात. असेच सोशल मीडियावर देसी जुगाडकरून प्रवास सुखद घेतल्याचा फोटो व्हायरल होत आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबईआणि मुंबईची लोकल ट्रेन मध्ये तुफान गर्दी असते आणि या गर्दीत प्रवास करणे सहज काम नाही. या लोकल ट्रेन मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी तारे वरची कसरत करावी लागते. एकदा लोकलच्या आत शिरल्यावर बसण्यासाठी जागा मिळवणे कठीण पण गर्दीत एका तरुणाने चांगलीच अद्दल लढवली. तो सामान ठेवण्याच्या जागी म्हणजे लोकल मध्ये वरील रॅक मध्ये चक्क झोपला आहे. त्याचा हा फोटो सध्या सोशल मिडित्यावर व्हायरल होत आहे.
व्हायरल फोटोमध्ये हा माणूस ट्रेन मध्ये सामानाच्या रॅक मध्ये शांत झोपला आहे. त्याने जीन्स आणि शर्ट घातला असून एका कपड्याने डोळे झाकलेले आहे. आणि तो शांतपणे झोपला आहे. त्याला बघून सर्वाना आश्चर्याचा धक्काच बसला. जिथे लोकांना बसायची जागा मिळत नाही तिथे या माणसाने देशी जुगाड करून आपला प्रवास आरामदायी केला.