शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 20 एप्रिल 2022 (14:55 IST)

प्रेयसीने प्रियकराला 10 रुपयांचा नोटांवर लिहून पाठवले ..'विशाल ;मेरी शादी 26 एप्रिल को है, फोटो व्हायरल !

नोटांवर काहीही लिहिणे बेकायदेशीर आहे. काही वर्षांपूर्वी 'सोनम गुप्ता बेवफा है' लिहिलेली एक भारतीय चलनी नोट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती, त्यावर लोकांनी अनेक मिम्स देखील बनवले होते. 
 
आता असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर कोणीतरी 10 रुपयांच्या नोटेवर एक विचित्र गोष्ट लिहून ती सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्या चिठ्ठीवर कोणीतरी पेनने लिहिले होते, 'विशाल, माझे लग्न २६ एप्रिलला आहे. मला घेऊन जा, मी तुझ्यावर प्रेम करते  तुझी कुसुम.'
 
या नोटवर लिहिलेले पाहता आपण समजू शकतो की या नोटवर दिलेल्या मेसेजच्या माध्यमातून ही कुसुम नावाची मुलगी जी विशाल नावाच्या मुलावर प्रेम करते तिचे लग्न येत्या 26 एप्रिल ला आहे. आणि तिचा या लग्नाला विरोध आहे. तिने अगदी आशेने की विशाल येऊन लग्नाच्या आधी पळवून नेईल. या महिलेच्या नोटावरील दिलेल्या मेसेजने सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. या व्हायरल फोटो मध्ये दिसत आहे की कुसुम नावाच्या या तरुणीने विशाल नावाच्या मुलासाठी लिहिले आहे. काही युजर्सनी हे ट्विट शेअर केला आहे.