शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated : मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022 (13:49 IST)

Electric Cycle : पेट्रोलच्या किंमती वाढल्यामुळे 14 वर्षाच्या मुलाने वडिलांसाठी बनवली इलेक्ट्रिक सायकल

cycle
Jugad Electric Cycle : पेट्रोलच्या किंमती सतत वाढत असताना अनेकांनी कारच नव्हे तर दुचाकीदेखील वापरणे अनेकांनी बंद केले आहे. प्रवासासाठी इतर मार्गाचा अवलंब केला जात आहे.अनेकांनी पायी प्रवासाचा मार्ग अवलंबला आहे. पेट्रोल महागल्याने कामावर पायी जाणाऱ्या वडिलांसाठी सांगली जिल्ह्यातील वांगी गावच्या सुशांत मेटकरी या मुलाने आपल्या वडिलांना कामावर सायकल वरून सहजरित्या जाता यावे यासाठी इलेक्ट्रिक सायकल बनवलीय.  ही ई-सायकल दोन तासांच्या चार्जिंगवर 50 किमीपर्यंत धावते. ही ई-सायकल तयार करणाऱ्या मुलाचे वय अवघे 14 वर्ष आहे.   
 
सुशांतने आपली सायकल बाहेर काढली. या सायकलला 12 व्होल्टच्या 2 बॅटरी  जोडल्या. आता.ही सायकल 2 तास चार्ज केली की 50 किमीपर्यंत विना पॅडेल मारता प्रवास करते, असे सुशांतने सांगितले. पेट्रोल वाढले म्हणून दुचाकी वापरणे बंद केलेल्या दत्तात्रय यांना मात्र आपल्या पोराच्या हुशारीच्या जोरावर दोन चाकी आणि पॅडेल न मारता फक्त रेस वाढवली की पळणारी इलेक्ट्रिक सायकल मिळाली असल्यामुळे त्यांना मुलाचे कौतुक आहे.