गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 29 ऑक्टोबर 2018 (08:56 IST)

‘२.०’चे ट्रेलर ३ नोव्हेंबर प्रदर्शित होणार

रजनीकांत, अक्षय कुमार, अॅमी जॅकसन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘२.०’हा चित्रपट त्याच्या बिग बजेटमुळे सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. नुकतच करण जोहरने ट्विटरच्या माध्यमातून या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. करणने ट्विट करत येत्या ३ नोव्हेंबर रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे. यासोबतच त्याने एक फोटोदेखील शेअर केला आहे.

या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच रजनीकांत आणि अक्षय कुमार स्क्रिन शेअर करणार आहेत. सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी कुमार यांच्या भूमिका असणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.  हा चित्रपट आतापर्यंतचा बिग बजेट चित्रपट ठरणार असल्याची चर्चा आहे. तब्बल ३५० कोटी खर्चून चित्रपटाची निर्मिती केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये रजनीकांत आणि अक्षय यांच्यासोबतच अॅमी जॅक्सन, सुधांशू पांडे आणि आदिल हुसैन यांच्याही भूमिका आहेत. ऑस्कर विजेते सुप्रसिद्ध संगीतकार ए.आर.रेहमान यांनी या चित्रपटाता संगीत दिले आहे.