सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 सप्टेंबर 2023 (14:42 IST)

3 इडियट्स फेम अभिनेत्याचे निधन, इमारतीवरून पडून अभिनेत्याचा मृत्यू

3 Idiots fame Akhil Mishra passes away चित्रपट जगतातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. आमिर खानच्या ‘3 इडियट्स’ या चित्रपटात ग्रंथपाल दुबेची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेला अभिनेता अखिल मिश्रा यांचं निधन झालं आहे. अखिल मिश्राच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताने इंडस्ट्रीत खळबळ उडाली असून चाहत्यांनाही या बातमीने धक्का बसला आहे. कामावर असताना इमारतीवरून पडून अभिनेत्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. 
 
3 इडियट्स या चित्रपटाव्यतिरिक्त, अखिलने उत्तरन, उडान, सीआयडी, श्रीमान श्रीमती यांसारख्या लोकप्रिय टेलिव्हिजन शोसह अनेक मालिकांमध्ये काम केले होते.
 
अखिलच्या पत्नीने सांगितले की, अभिनेता हैदराबादमध्ये एका प्रोजेक्टसाठी शूटिंग करत असताना बाल्कनीजवळ काम करताना उंच इमारतीवरून ते पडले. अखिलने अखेरचा श्वास घेतला तेव्हा अखिलची पत्नी सुझान बर्नर्ट हैदराबादमध्ये उपस्थित होती. या वेळी त्या म्हणाल्या की"माझे हृदय तुटले आहे, माझा जीवनसाथी गेला आहे".
 
जर्मन अभिनेत्री सुझान बर्नर्टसोबत लग्न झाले होते
अखिलने 3 फेब्रुवारी 2009 रोजी जर्मन अभिनेत्री सुझान बर्नर्टशी लग्न केले होते. 2019 मध्ये, या जोडीने "मजनू की ज्युलिएट" नावाच्या एका लघुपटावर काम केले ज्यामध्ये मिश्राने केवळ अभिनयच केला नाही तर त्याचे लेखन आणि दिग्दर्शनही केले. त्यांची पत्नी सुझानने कसौटी जिंदगी की, सावधान इंडिया, एक हजारों में मेरी बहना है, चक्रवर्ती अशोक सम्राट, ये रिश्ता क्या कहलाता है यांसारख्या अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे.