1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 मे 2022 (08:20 IST)

शाहरुख खानच्या बंगल्याजवळ भीषण आग

अभिनेता शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) ‘मन्नत’ बंगल्याजवळील एका इमारतीला भीषण आग लागली. वांद्रेमधील असलेल्या या इमारतीचे नाव जिवेश असं आहे. या ठिकाणांवरुन शाहरुख खानचा बंगला जवळच आहे.
 
जीवेश ही इमारत एकूण 21 मजली आहे. या इमारतीच्या 14 व्या मजल्यावर आग लागली. अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या  8 गाड्या घटनास्थळी पोहचल्या. ही आग इमारतीच्या 14 व्या मजल्यावर लागल्यामुळे फायर ब्रिगेडच्या जवानांना ही आग विझवण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. आगची कारण स्पष्ट झाले नाही.
 
या आगीत कोणतीही जिवत हानी झाली नाही. इमारतीतील रहिवाश्यांना दुसरीकडे स्थलांतरीत करण्यात आले. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आणि आरोग्य यंत्रणाही घटनास्थळी पोहोचल्याचे समजते. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाल यश आले आहे. घटनास्थळी 8 फायर इंजिन आणि 7 जम्बो पाण्याचे टँकर आहेत. लेव्हल 2 ची ही आग असल्याचं अग्निशमन दलाकडून माहिती देण्यात आली आहे.