शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 (15:38 IST)

आमिर खानची मुलगी इराला बॉयफ्रेंडने केले फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज, KISS करताना व्हिडिओ व्हायरल

ira khan
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी इरा खान अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. इरा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. इराही सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अपडेट्स देत असते. अलीकडेच इराने तिची बॉयफ्रेंड नुपूर शेखरसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून तिचे चाहते खूश झाले आहेत.
 
इरा खानने बॉयफ्रेंड नुपूर शेखरसोबत एंगेजमेंट केल्याची बातमी आहे. नूपुरने इराला अतिशय रोमँटिक स्टाईलमध्ये प्रपोज केले आहे, ज्याची एक झलक इराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. इराने शेअर केलेला व्हिडिओ पाहता ती एका स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये उपस्थित असल्याचे दिसते. दरम्यान, नुपूर येऊन इराला आपल्या गुडघ्यावर बसून फिल्मी पद्धतीने प्रपोज करतो. इरा जेव्हा हो म्हणते तेव्हा तो तिला अंगठी घालातो आणि किस करतो.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

इरा आणि नुपूरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इराचा हा व्हिडीओ पाहून तिचे चाहतेच नाही तर सेलिब्रिटीही तिचे अभिनंदन करत आहेत.
 
नुपूर अनेकदा कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये इरासोबत दिसतो. त्याचबरोबर इरा आणि नुपूर आमिर खानसोबत अनेकदा दिसले आहेत. नुपूर एक फिटनेस कोच आहे.