शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 ऑगस्ट 2020 (08:01 IST)

‘लालसिंग चड्ढा’ च्या प्रदर्शनाची तारीख बदल

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा बहुचर्चित ‘लालसिंग चड्ढा’ हा चित्रपट आधी हा चित्रपट २०२० मध्ये नाताळला प्रदर्शित होणार होता. पण आता प्रदर्शनाची तारीख  बदलण्यात आली आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. ‘आमिर खान आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत असणारा लालसिंग चड्ढा हा चित्रपट २०२१मध्ये नाताळला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वेत चंदन करत आहेत’ असे त्यांनी म्हटले आहे.

१९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटावरुन ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटाचे कथानक तयार करण्यात आले आहे. या चित्रपटात आमिर एक पंजाबी व्यक्तिरेखा साकारत आहे. तसेच करीना कपूर देखील या चित्रपटात पंजाबी मुलीची भूमिका साकारणार आहे.