1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 एप्रिल 2018 (10:55 IST)

अभिषेक बच्चन झाला ट्रोल

abhishekh bachhan
आता अभिषेक बच्चन या वयातही आई-वडिलांसोबत राहत असल्याचं म्हणत एका यूझरमुळे ट्रोल झाला'तुमच्या आयुष्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका. लक्षात ठेवा, अभिषेक बच्चन अजूनही आपल्या पालकांसोबत राहतो.' असं ट्वीट एका व्यक्तीने ट्विटरवर केलं. दरवेळीप्रमाणे अभिषेकने या ट्रोलरलाही शिंगावर घेतलं. 'हो, मी माझ्या पालकांसोबत राहतो. त्यांच्यासोबत राहण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे' असं उत्तर अभिषेकने ट्रोलरला दिलं.

'कधी तुम्ही पण पालकांसोबत राहण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला स्वतःविषयी चांगलं वाटेल.' असा टोलाही अभिषेकने ट्रोलरला लगावला. अनेक जणांनी या ट्रोलरवरच टीकेचा भडिमार केला आहे.