रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 मार्च 2024 (09:23 IST)

अभिनेता धर्मेंद्र लग्न सोहळ्यात जखमी

काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर आपला एक फोटो शेअर केला होता. या फोटोत धर्मेंद्र हे खूपच थकल्यासारखे दिसत होते. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत अपडेट समोर आली आहे. मागील दोन आठवड्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आता त्यात सुधारणा होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
 
दरम्यान, धर्मेंद्र नुकतेच उदयपूर येथे सनी देओल आणि बॉबी देओलसह कौटुंबिक लग्न सोहळ्याला उपस्थित होते. या लग्नसोहळ्यात नाचत असताना तोल जाऊन धर्मेंद्र पडले आणि दुखापतग्रस्त झाले. त्यांच्या पाठीला आणि पायाला दुखापत झाली. थकवा आणि वयोमानामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. सूत्रांनुसार आता धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor