1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 एप्रिल 2024 (11:18 IST)

अभिनेते सयाजी शिंदे रुग्णालयात दाखल

Sayaji Shinde
अभिनेते सयाजी शिंदे यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केले असून साताराच्या रुग्णालयात त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया पार पडली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

मराठी, हिंदी आणि दक्षिणेच्या चित्रपटात आपला अभिनयाचा ठसा उमटवणारे सयाजी शिंदे यांची तब्बेत बिघडली आहे. त्यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना साताऱ्याच्या रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृती बाबत अपडेट दिले आहे.

त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. डॉक्टर म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून त्यांना अस्वस्थता जाणवत होती. त्यांनी रुटीन चेकअप म्हणून काही तपासण्या केल्या असून त्यांच्या ईसीजी मध्ये काही चेंजेस आढळले. त्यांच्या हृदयाच्या एका छोट्या भागाची हालचाल कमी होताना आढळली. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या त्यांच्या तब्बेतीत सुधारणा लवकर व्हावी म्हणून चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे.  
 
 Edited by - Priya Dixit