रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 10 डिसेंबर 2023 (14:33 IST)

Vidyut Jammwal Nude Photoshoot : अभिनेता विद्युत जामवालचा न्यूड फोटो व्हायरल!

VIdyut Jamval
बॉलीवूड अभिनेता विद्युत जामवाल त्याच्या अभिनयासाठी आणि स्टंटसाठी खूप प्रसिद्ध आहे. तो अनेकदा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. यावेळी विद्युतने असे काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून लोकांना रणवीर सिंग आणि अॅनिमलचे रणबीर आठवले.

रणवीर सिंगने 2022 मध्ये न्यूड फोटोशूट केले होते, ज्यावरून बराच वाद झाला होता. अलीकडेच रणबीर कपूर 'अॅनिमल' चित्रपटाच्या एका दृश्यात कपड्यांशिवाय दिसत आहे. आता विद्युत जामवालनेही असेच काहीसे केले आहे. रविवारी सकाळी अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक न्यूड फोटो शेअर केला.तो व्हायरल झाला असून ज्याची खूप चर्चा झाली आहे.विद्युत जामवाल सध्या हिमालयात आहेत. जिथे त्याने तीन फोटो शेअर केले 
 
या पोस्टसोबतच अभिनेत्याने त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणाही केली आहे. त्यांनी पुढे लिहिले की, आता मी माझ्या पुढील अध्यायासाठी तयार आणि उत्साहित आहे - क्रॅक, जो 23 फेब्रुवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्याच्या न्यूड फोटोवर युजर्स आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.
 
Edited by - Priya Dixit