शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 10 डिसेंबर 2023 (14:04 IST)

मन उडू उडू झालं’ फेम अभिनेता विनम्र भाबल अडकला लग्नबंधनात

vinamra
social media
सध्या लग्न सराय सुरु आहे. सिने सृष्टीत देखील अनेक जोडपे विवाहाच्या बंधनात अडकले आहे. अलीकडील अभिनेता पियुष रानडे आणि सुरुची आडारकर हे वैवाहिक बंधनात अडकले. 
आता मन उडू-उडू झालं या गाजलेल्या मालिकेतील सत्तूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता विनम्र भाबल हा लग्नबंधनात अडकला आहे. विनम्र ने पुजाशी  8 डिसेंबर रोजी लग्न केलं.

या लग्नसोहळ्यात मन उडू-उडू  मालिकेतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. अभिनेत्री हृता दुर्गुळे, पूर्णिमा तळवलकर, रीना मधुकर, प्राजक्ता परब हे देखील लग्न सोहळ्यात उपस्थित होते. विनम्रला काही कलाकारांनी लग्नाचे फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. 

अभिनेता विनम्र मराठी मालिकांसह अनेक नाटकांमध्ये झळकला आहे. सध्या त्याचे राजू बन गया जेंटलमेन हे नाटक सुरु आहे. या नाटकात अमृता फडके, उमेश जगताप , अंशुमन विचारे हे कलाकार देखील आहे. 
 
Edited by - Priya Dixit