सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 5 एप्रिल 2022 (19:02 IST)

अभिनेता विराजस कुलकर्णीला रस्त्यावरून जाताना भूत दिसला, अभिनेता ने अनुभव शेअर केला

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे चिरंजीव अभिनेता विराजस कुलकर्णी हा माझा होशील का या मालिकेतून झळकला. हा अभिनेता सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो आणि आपले पोस्ट टाकत असतो. या अभिनेत्याने आपल्या सोबत पुण्यात जे काही घडले ते इंस्टाग्राम वर शेअर करून सांगितले आहे. अभिनेता विराजस कुलकर्णी याला पुण्यात मध्यरात्री येताना भूत दिसला.होय, हे ऐकून धक्काच बसला. पण अभिनेत्याची भुताला बघून बोबडीच वळली. 
 
अभिनेत्या ने आपल्या इंस्टावर ही पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याने सांगितले की, नाटकाचे काम संपवून तो आपल्या मित्रासह बाईक वरून घरी जात असताना मला बाईकच्या समोर एक माणूस असल्याचा भास झाला. माझा मित्र बाईक चालवत होता तर मी मागे बसून होतो. तेवढ्यात मला बाईकच्या रस्त्यावर धोतरं पांढरा शर्ट डोक्यावर गांधी टोपी घातलेले आजोबा दिसले आणि क्षणातच ते दिसेनासे झाले. तेवढयात माझ्या मित्राने करकचून बाईकला ब्रेक लावला आणि मी भानावर आलो. मित्राने सॉरी म्हटले. मी सॉरी कशा बद्दल विचारल्या वर त्याने जोरात ब्रेक लावले असे सांगितले. पण मला एक आजोबा पांढरे शर्ट घालून धोतरं डोक्यावर गांधी टोपी घातलेले बाईकच्या रस्त्यावर आलेले दिसले आणि नंतर क्षणातच नाहीसे झाले. त्यामुळे मला ब्रेक लावावा लागला. मित्राचे बोलणे ऐकून मला अक्षरश: घाम फुटला.

मी त्याला गाडी कुठेही न थांबता गाडी पळव असे सांगितले नंतर आम्ही आपापल्या घरी पोहोचलो. तो भास होता की खरचं ती व्यक्ती दिसली आणि कुठे गेली हे कळलेच नाही. 
विराजसच्या या पोस्टवर अनेकांनी कॉमेंट्स केले आहेत. विराजस याचे लग्न शिवानी रंगाळे हिच्याशी झाला असून लवकरच ते लग्नाच्या वेडीत अडकणार आहे.