सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 एप्रिल 2022 (18:02 IST)

Ranbir-Alia Wedding: रणबीर आणि आलियाच्या लग्नाची तारीख जाहीर, या दिवशी वैवाहिक बंधनात बंधणार

ranbir alia
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट कधी लग्न करणार, हा प्रश्न अनेक दिवसांपासून लोकांच्या मनात आहे. अलीकडेच काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की दोघे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात लग्न करू शकतात. त्याचबरोबर आता दोघांच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघे 17 एप्रिलला लग्नबंधनात अडकू शकतात. 
 
रिपोर्ट्सनुसार,आलियाचे आजोबा एन राझदान यांची प्रकृती अत्यंत नाजूक असून, त्यांनी आलिया आणि रणबीरचे लग्न पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कपूर आणि भट्ट कुटुंबातील एका जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आलियाचे आजोबा रणबीरवर खूप प्रेम करतात आणि त्यांना दोघांना लग्नगाच्या वेडीत अडकलेलं बघायचं आहे.  
 
सूत्रांनी दिलेल्या माहिती प्रमाणे आलियाच्या आजोबांची प्रकृती अत्यन्त नाजूक आहे आणि  सध्या परिस्थितीनुसार, 17 एप्रिल ही लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. असे सांगितले जात आहे की हा विवाह सोहळा अतिशय खाजगी असेल आणि खूप कमी लोकांना यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाईल. रिपोर्ट्सनुसार, रणबीर आणि आलिया आरके स्टुडिओच्या साइटवर लग्न करणार आहेत.रणबीरचे आई-वडील ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचेही आरके स्टुडिओ हाऊसमध्ये लग्न झाले होते.