सोमवार, 7 ऑक्टोबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 डिसेंबर 2023 (18:19 IST)

अभिनेत्री लक्ष्मीका संजीवन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मल्याळम अभिनेत्री लक्ष्मीका संजीवन यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं अवघ्या 24 व्या वर्षी अभिनेत्रींचे  निधन झाले. त्यांनी कक्का या चित्रपटात पंचमीची भूमिका साकारली होती. त्यांना या भूमिकेपासून चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. अभिनेत्रींच्या निधनाने मल्याळम सृष्टीत शोककळा पसरली आहे. लक्ष्मीका सजीवनचे शुक्रवारी संयुक्त अरब अमिरातचे शारजाह येथे निधन झाले. 

लक्ष्मीका सजीवन यांची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट 2 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर करण्यात आली होती. या पोस्टमध्ये त्याने सूर्यास्ताचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे.
 
लक्ष्मीका सजीवनच्या अकाली निधनाची बातमी व्हायरल झाल्यानंतर लगेचच तिच्या चाहत्यांपासून ते मल्याळम इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींपर्यंत सगळेच तिला सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत. याशिवाय, लक्ष्मीकाच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिच्या शेवटच्या इंस्टाग्राम पोस्टच्या कमेंट सेक्शनला पूर आला आहे.
 
लक्ष्मीका सजीवनने अनेक चित्रपट तसेच टीव्ही शोमध्ये काम केले होते. दुलकर सलमानसोबत पंचवर्णथा, सौदी वेलाक्का, पुझयम्मा, उयारे, ओरु कुट्टनादन ब्लॉग, नित्याहारिता नायगन आणि ओरु यमंदन प्रेमकथा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
 
Edited by - Priya Dixit