रविवार, 11 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 7 जून 2017 (11:11 IST)

अभिनेत्री ममता कुळकर्णी आणि तिचा नवरा फरार घोषित

actress mamta kulkarni

दोन हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिन तस्करी प्रकरणी अभिनेत्री ममता कुळकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामी यांना ठाणे न्यायालयाने मंगळवारी फरार घोषित केले. आरोपींची मालमत्ता जप्त करणे आणि त्यांच्याविरूद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावणे आता शक्य होणार आहे. 13 एप्रिल 2016 रोजी ठाणे पोलिसांनी दोन आरोपींकडून 12 लाख रुपयांचा इफेड्रिन नावाचा मादक पदार्थ जप्त केला होता. पोलिसांनी सोलापूर येथील एव्हॉन लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या फॅक्टरीवर छापा टाकून 2 हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिनची देश-विदेशात तस्करी करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड केला होता. या प्रकरणात ममता कुळकर्णी आणि विकी गोस्वामीचा सहभाग पोलिसांनी न्यायालयासमोर स्पष्ट केल्यानंतर त्यांच्याविरूद्ध तीनवेळा अटक वॉरंट बजावण्यात आले