1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 24 डिसेंबर 2022 (20:51 IST)

अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवर गळफास लावून केली आत्महत्या

Actress Tunisha Sharma committed suicide by hanging herself on the sets of the serial
मुंबई येथे अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केली. तिला रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले. यासंदर्भात वालीव पोलिसांनी माहिती दिली आहे. सध्या तुनिशा सब टीव्हीच्या दास्तान-ए-काबुल या शोमध्ये मुख्य भूमिकेत होती,  इतके मोठे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकलेलं नाही.
 
रामदेव स्टुडिओच्या बाथरूम मध्ये अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने शनिवारी नायगावच्या गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.अलिबाबा दास्ताने काबुल या मालिकेत सोनी सब चॅनेलवरील मुख्य अभिनेत्री म्हणून ती काम करत होती.
 
मिळालेल्या माहितीनुसार, ती शनिवारी मालिकेच्या सेटवर आली होती. पण ती सेटवर दिसली नाही. त्यानंतर तिच्या सहकारी तिला बोलावण्यासाठी गेल्या. त्यांनी दरवाजा ठोठावला. पण तिने दरवाजा न उघडल्यामुळे दरवाजा तोडण्यात आला. तिने पंख्याला गळफास घेतल्याचे पाहून सर्व सहकाऱ्यांना धक्का बसला. तिला उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले पण तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तिचे कोणत्या अभिनेत्यासोबत अफेअर किंवा काही वाद झाल्याचे सूत्रांकडून समजते आहे. पण, तिने आत्महत्या का केली व कोणत्या कारणामुळे याचा नालासोपारा येथील वालीव पोलीस तपास करत असल्याचे उपायुक्त सुहास बावचे यांनी सांगितले.या बाबत दैनिक लोकमत ने अधिकृत वृत्त दिले आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor