शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 21 जून 2023 (12:13 IST)

हनुमान रामभक्त होते, आम्ही त्यांना देव बनवले : मनोज मुंतशिर यांचे वादग्रस्त विधान

ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' हा चित्रपट रिलीज झाल्यापासूनच वादात सापडला आहे. रामायणावर आधारित या चित्रपटात अश्लील संवाद ऐकून प्रेक्षकांची निराशा झाली आहे. त्यामुळे 'आदिपुरुष'चे संवाद लेखक मनोज मुंतशिर यांच्यावर जोरदार टीका होत आहे. यापूर्वी मनोज मुंतशिर यांनी या चित्रपटातील वादग्रस्त संवाद लवकरच बदलणार असल्याचे सांगितले होते.
 
तर आता मनोज यांनी आपला त्रास अजूनच वाढवून घेतला आहे. मनोज म्हणाले की, हनुमानजी हे देव नव्हते तर राम भक्त होते. आम्ही त्यांना देव बनवले. मनोज मुंतशीर यांनी एका मुलाखतीदरम्यान ही माहिती दिली आहे. चित्रपटातील हनुमानजींच्या व्यक्तिरेखेसाठी लिहिलेल्या संवादावरुन गदारोळ माजला आहे.
 
आज तकला दिलेल्या मुलाखतीत मनोज म्हणाले, साध्या भाषेत लिहिण्यामागील आमचे एक उद्दिष्ट हे होते की बजरंगबली, ज्याला आपण शक्ती, बुद्धिमत्ता आणि विद्या याचे दैवत मानतो. ज्या बजरंगबलीकडे डोंगरासारखे बळ आहे, ज्याचा वेग शेकडो घोड्यांचा आहे, तोच बजरंगबली लहान मुलासारखा आहे.
 
त्यांनी म्हटले की त्याचे बालसुलभ स्वभाव असा आहे की ते हसतात. ते श्रीराम यांच्यासारखे बोलत नाही. ते तात्विक बोलत नाही. बजरंगबली हे देव नाही, ते भक्त आहे. आम्ही त्यांना नंतर देव बनवले कारण त्यांच्या भक्तीत ती शक्ती होती.
 
मनोज मुंतशिर यांच्या हा इंटरव्यूह व्हायरल झाल्यानंतर यूजर्स अजूनच भडकले आहेत. यूजरचे म्हणणे आहे की या प्रकारे विधान करुन हे अजूनच सेंटिमेंट्स हर्ट करत आहे.
 
आदिपुरुषबद्दल होत असलेल्या गोंधळाचा प्रभाव आता चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर दिसून येत आहे. वृत्तानुसार, सोमवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये 65 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. त्याचबरोबर काठमांडूमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.