बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 मार्च 2018 (10:46 IST)

'रेड' चित्रपट वेबसाईटवर लीक

'रेड' हा चित्रपट पायरसीच्या विळख्यात अडकला आहे. रेड हा चित्रपट वेबसाईटवर लीक झाला आहे. हा चित्रपट rdxhd, moviespur, bigdaddymovies, aeonsource यासारख्या अनेक साईटवर लीक झाला आहे. याचा परिणाम चित्रपटाच्या ऑनलाईन कलेक्शनवर होणार आहे. भारतामध्ये पायसीबाबत कडक कायदे करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधितांना तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते. असे असूनही 'रेड' चित्रपट हा सर्रास ऑनलाईनवर लीक झाला आहे. पायरसीच्या नियमांनुसार, पायरेटेड कंटेंड पाहणं किंवा डाऊनलोड करणं हा गुन्हा आहे. त्याकरिता आरोपींना तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते. आता  याचा परिणाम चित्रपटाच्या ऑनलाईन कलेक्शनवर होणार आहे.