बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 19 मार्च 2018 (15:37 IST)

'रेड' ला मिळाली बंपर ओपनिंग

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री इलियाना डिक्रुझ यांचा रेड हा सिनेमा वर्षातील दुसरा सर्वात मोठा ओपनिंग सिनेमा ठरलाय. पहिल्या वीकेंडला या सिनेमाने जबरदस्त कमाई केलीये. सिनेमाने पहिल्या तीन दिवसांत ४१.२५ कमाई केलीये. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बालाच्या ट्विटनुसार, पद्मावतनंतर ओपनिंगला सर्वाधिक कमाई करणारा रेड दुसरा सिनेमा ठरलाय.  

अजय देवगणच्या या सिनेमाचे केवळ प्रेक्षकांनीच नव्हे तर समीक्षकांनीही कौतुक केलेय. या सिनेमा इलियाना अजयच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. या सिनेमाची कहाणी खऱ्या घटनेवर आधारित आहे. अजय देवगण यात लखनऊचा इनकम टॅक्स अधिकारी शरद प्रसाद पांडेच्या भूमिकेत आहे.