सोमवार, 1 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. आगामी नाट्य-चित्र
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 मार्च 2018 (12:06 IST)

व्हॉट्‌स अ‍ॅप लग्न

whatsapp lagna marathi film
वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहेरे 'व्हॉट्‌स अ‍ॅप लग्न' या चित्रपटातून रसिकांसमोर येत आहेत. हा नातेसंबंधांकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला लावणारा चित्रपट आहे. नात्यांमधले विविध कंगोरे यात पाहायला मिळतील. वैभव आकाश तर प्रार्थना अनाया ही व्यक्तिरेखा साकारत आहे. 
 
आकाश आयटीमध्ये आहे तर अनाया अभिनेत्री. दोघांचे व्यवसाय, आवडीनिवडी पूर्ण भिन्न. वैभवचं आयुष्य समाधानी आणि दृष्ट लागण्यासारखं आहे तर अनाया त्याच्या अगदी उलट आयुष्य जगतेय. तिची सतत धावपळ सुरू असते. आयुष्याच्या एका वळणावर ते अनपेक्षितपणे भेटतात. त्यांच्यात मैत्री होते. या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं. ते दोघंलग्नाचा निर्णय घेतात. आयटी आणि अभिनय ही दोन्ही क्षेत्रं धकाधकीची. लग्नानंतर दोघांची कारकिर्द बहरू लागते. पण याचा परिणाम त्यांच्या नात्यावर होऊ लागतो. वैयक्तिक आयुष्यात ताणतणाव निर्माण होतात. पण या काळातही हे दोघं नातं टिकवून ठेवतात. आव्हानात्मक काळाचा सामना करतात, वास्तववादी अपेक्षा ठेवतात. आकाश आणि अनाया यांचं नातं कसं फुलतं याची कथा म्हणजे 'व्हॉट्‌स अ‍ॅप लग्न' हा चित्रपट. विक्रम गोखले, ईला भाटे, विद्याधर जोशी, वंदना गुप्ते, स्नेहा रायकर असे कलाकार चित्रपटात आहेत. विश्वास जोशी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
- विधिषा देशपांडे