बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 4 मार्च 2019 (16:37 IST)

आता अजय देवगणदेखील बायोपिक चित्रपटात दिसणार

बॉलीवूड दिग्दर्शक अमित शर्माने गेल्या वर्षी 'बधाई हो' सारखे एक प्रशंसनीय आणि मनोरंजक चित्रपट तयार केले होते. आता या चित्रपटानंतर अमित एका स्पोर्ट्स बायोपिकला घेऊन येत आहे ज्यात अजय देवगण मुख्य भूमिकेत असेल. हा चित्रपट फुटबॉलवर आधारित असेल.
 
अहवालानुसार अजय देवगणची मुख्य भूमिका असलेले हे चित्रपट सन 1951 ते 1962 च्या दरम्यान भारतीय फुटबॉलच्या सुवर्णयुगावर आधारित आहे. या चित्रपटात अजय देवगण सईद अब्दुल रहीमची भूमिका बजावणार. सईद हे त्यावेळी भारतीय राष्ट्रीय फुटबॉल टीमचे कोच आणि मॅनेजर होते.  
 
अमित शर्मा म्हणाले की या वर्षी मे किंवा जूनमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल. सध्या दर्शकांचे अशा चित्रपटांकडे कळ आहे असे चित्रपट चांगली कमाई देखील करत आहे. तथापि, जेव्हा यशस्वी चित्रपटाची व्याख्या त्यांना विचारण्यात आली तेव्हा ते म्हणाले की यशस्वी चित्रपटांची कोणतीही व्याख्या नसते आणि यशस्वी व्यक्तीने त्याचे यश मिळाल्यावरदेखील स्वत:वर ताबा ठेवला पाहिजे.