गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 एप्रिल 2022 (08:43 IST)

अक्षय कुमारची तंबाखूच्या जाहिरातीतून माघार, माफी मागितली

अभिनेता अक्षय कुमारने तंबाखूच्या जाहिरातीतून माघार घेतली आहे. ट्विटरवरून त्याने ही घोषणा केली आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून विमलच्या जाहिरातीत अक्षय कुमार दिसल्यावर चाहत्यांनी त्याच्यावर टीकेचा भडिमार केला होता.
 
आपल्या ट्विटमध्ये त्याने लिहिलंय, "मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची माफी मागतो. गेल्या काही दिवसांपासून येणाऱ्या प्रतिक्रियांचा माझ्यावर परिणाम झाला आहे. मी तंबाखूचे समर्थन करत नाही आणि करणारही नाही.
 
"विमल इलायची बरोबर केलेल्या जाहिरातीनंतर तुम्ही व्यक्त केलेल्या तुमच्या भावनांचा मी आदर करतो. त्यामुळे नम्रतेने मी माझे पाऊल मागे घेतो. मी ठरवलं आहे की जाहिरातीसाठी घेतलेले सर्व मानधन मी धर्मादाय संस्थेला देईन."