गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 25 मे 2019 (11:48 IST)

कॅटरीना आणि दीपिकाला मागे सोडत 'मोस्ट डिजायरेबल वूमन' बनली आलिया भट्ट

alia bhatt
बॉलीवूडची बिंदास आणि सुंदर अभिनेत्री आलिया भट्ट आपल्या चित्रपटांची निवड पासून लव्ह लाईफपर्यंत चर्चेत आहे. आता तर आलियाने 'द टाइम्स मोस्ट डिजायरेबल वूमन'च्या यादीत आपले नाव टॉपवर आणले आहे. या लिस्टमध्ये देशाच्या सर्वात सुंदर आणि ग्लॅमर्स महिलांना सामील करण्यात येते.  
Photo : Instagram
आलिया भट्टने कॅटरीना कैफ, दीपिका पादुकोण, जॅक्लीन फर्नांडीज, अदिती राव हैदरी, दिशा पटानी आणि श्रद्धा कपूर सारख्या नायिकांना 2018च्या मोस्ट डिजायरेबल महिलांच्या यादीत मागे टाकले आहे. दीपिका पादुकोणने 2017 च्या मोस्ट डिजायरेबल महिलांच्या यादीत शीर्ष स्थान मिळविले होते, पण या वर्षी आलियाने या किताबावर आपला कब्जा केला आहे.  
Photo : Instagram
आलियाला आधीपासूनच तिचे सहायक कलाकार आणि इंडस्ट्रीचे दुसरे लोक देखील टॅलंटचा पावरहाउस मानतात. वर्ष 2018मध्ये आलियाने थ्रिलर चित्रपट 'राजी'पासून प्रेक्षकांचे मन जिंकले होते तसेच या चित्रपटाला बरेच अवॉर्डास देखील मिळाले होते. चित्रपट राजीसाठी आलियाला 'फिल्मफेयर अवॉर्डास' देखील मिळाला आहे.  
Photo : Instagram
'द टाइम्स मोस्ट डिजायरेबल वूमन'च्या लिस्टमध्ये तिसर्‍या नंबरवर कॅटरीना कैफ, चवथ्या नंबरावर दीपिका पादुकोण, सहाव्या क्रमांकावर अदिती राव हैदरी, आठव्या नंबरावर जॅक्लीन फर्नांडिस, नवव्या क्रमांकावर दिशा पाटनी आहे. या यादीत त्याच महिलांना सामील करण्यात येतात ज्यांनी सेक्स अपील, ऍटिट्यूड आणि टॅलेंटच्या बळावर आपल्या क्षेत्रात नाव आणि प्रसिद्धी मिळवली आहे.