Marathi Biodata Maker
✕

आलिया भट्टचा ‘सडक २’होणार डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

Updated: मंगळवार, 30 जून 2020 (08:40 IST)
 
तसेच या चित्रपटाची निर्मिती मुकेश भट्ट यांनी केली आहे. आता हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार (Sadak2 Release on OTT Platform)असल्याचे समोर आले आहे.
 
मुकेश भट्ट यांनी नुकतीच पीटीआयला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी सडक २ डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले आहे. ‘करोनाचा संसर्ग होत असलेल्यांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 
 
अशा परिस्थितीमध्ये चित्रपटगृह उघणार असे तुम्हाला वाटते का? आणि जरी सुरु झाली आणि सडक २ प्रदर्शित केला तर प्रेक्षक तो पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये जातील? प्रत्येकाला आपल्या कुटुंबीयांची काळजी आहे’असे त्यांनी म्हटले.
 
‘सध्याच्या परिस्थितीने मला सडक २ डिजिडट प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास भाग पाडले (Sadak2 Release on OTT Platform) आहे. हा एकच पर्याय आहे माझ्याकडे’असे मुकेश भट्ट यांनी पुढे म्हटले आहे. 
 
‘सडक’चित्रपटात अभिनेत्री पूजा भट्ट मुख्य भूमिकेत होती आणि आता ‘सडक’च्या सिक्वेलमध्ये देखील पूजा महत्वाची भूमिका साकारणार आहे. पूजा भट्टसह आलिया देखील चित्रपटात झळकणार आहे. तसेच त्यावेळी चित्रपटात संजय दत्तची भूमिका ३२ वर्षांच्या व्यक्तीची होती आणि आता सडकच्या सिक्वेलमध्ये संजय दत्त ५४ वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आलिया पहिल्यांदाच वडीलांसोबत काम करणार आहे. 
 
यापूर्वी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुरानाचा गुलाबो सिताबो चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता. तसेच लवकरच अभिनेत्री विद्या बालनचा शकुंतला देवी, जान्हवी कपूरचा गुंजन सक्सेना, सुशांत सिंह राजपूतचा दिल बेचारा हा चित्रपट देखील डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

Hurun Rich List 2026: संपत्तीत लक्षणीय घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता, अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर

सर्व पहा

डोळ्यात अश्रू दाटून आले पण विद्युत जामवाल २० मिनिटे पापणीही न मिटवता उभा राहिला, व्हिडीओ हायरल

खलनायकापासून सुपरस्टारपर्यंतचा प्रवास; विनोद खन्ना यांनी अमिताभ बच्चन यांनाही दिली होती कडवी टक्कर

राजपाल यादव यांच्या अडचणी वाढल्या, सर्वोच्च न्यायालय म्हणाले 'तुरुंग हेच योग्य ठिकाण,' २ कोटी जमा करण्याची शेवटची संधी

राजे-महाराजांच्या काळापासून प्रसिद्ध असलेली महाराष्ट्रातील देवीची मंदिरे

मुंबईत 'रामायण'च्या सेटवर आग, चित्रीकरण थांबवले

पुढील लेख