मंगळवार, 16 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 24 ऑगस्ट 2020 (12:09 IST)

सारा आणि कार्तिकदरम्यान ‘ऑल इज नॉट वेल'

All is not well
सारा अली खान आणि कार्तिक आर्यन हे दोघेही नव्या जमान्याचे उगवते स्टार आहेत. गेल्यावर्षी ‘लव्ह आज कल'मध्ये हे दोघेही एकत्र होते. तेव्हापासून त्यांच्यातल्या केमिस्ट्रीची चर्चा व्हायला लागली होती. त्या दोघांना बर्याअचवेळा एकत्र बघितले गेले आहे. मात्र त्यांनी आपल्यातील रिलेशनशीपबाबत कोणतेही कॉमेंट केलेले नाहीत. आता तर त्यांच्यातील केमिस्ट्री बिघडली आहे, असेच बी टाउनमधील निरीक्षकांचे म्हणणे आहे. कारण आता या दोघांनीही इन्स्टाग्रावर एकमेकांना अनफॉलो केले आहे. त्यांनी एकमेकांना अनफॉलो करणे ही तशी धक्कादायक बाब आहे. मात्र त्याचे कारण मात्र समजू शकलेले नाही. त्यांच्यात काही तरी बिनसले आहे, एवढे मात्र नक्की.
 
वर्कफ्रंटच्या बाबतीत बोलायचे तर भुलभुलैय्या 2, दोस्तांना 2 या आगामी सिनेमातून कार्तिक दिसणार आहे. या सिनेमांमधील त्याचला लूक रिलीज झाला आहे. या सिनेमांबाबत खूपच चर्चाही झाली होती. तसेच दुसरीकडे साराही ‘कुली नं. 1'मध्ये वरुण धवन बरोबर दिसणार आहे. लॉकडाउनमुळे हा सिनेमा रिलीज होऊ शकलेला नाही. याशिवाय ‘अतरंगी रे'मध्येही सारा दिसणार आहे.