बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 5 ऑगस्ट 2020 (19:21 IST)

भारतीय सैन्याला अभिवादन करत अल्ट बालाजी आणि झी 5 यांनी 'द टेस्ट केस'च्या दुसऱ्या सिझनची केली घोषणा!

ड्रामा-थ्रिलरच्या भव्य यशानंतर,  'द टेस्ट केस' ज्याने प्रेक्षकांना रोमांचित केले होते. आता अल्ट बालाजी आणि झी 5 या शोच्या दुसर्‍या सीझनसह पुन्हा एकदा प्रेक्षकांना रोलर-कोस्टर राइडचा प्रवास घडवण्यास सज्ज झाला आहे. हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की या डिजिटल प्लेटफार्मने नेहमीच आपल्या प्रत्येक शोच्या माध्यमातून देशभक्तीची खरी भावना जागृत करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.
 
अल्ट बालाजीचा हा सर्वात प्रशंशनीय आणि लोकप्रिय शो असून याच्या पहिल्या सिझनमध्ये निमरत कौरने कॅप्टन शिखा शर्माची भूमिका केली होती. नागेश कुकुनूर आणि विनय वैकुल दिग्दर्शित या शो मध्ये सैन्यात लढाईत भाग घेणारी पहिली महिला तिने साकारली होती. सैन्य युद्ध आदी पुरुषी-वर्चस्व असलेल्या लष्करी वर्तुळात उत्कृष्ट कामगिरी करून देशाची सेवा करणे हे तिचे लक्ष्य होते. यामध्ये जूही चावला, अतुल कुलकर्णी, राहुल देव, आणि अनूप सोनी यांच्या देखील भूमिका होत्या. 'द टेस्ट केस' हा 2017 मध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेला ओटीटी शो होता. आणि आता निर्मात्यांनी भारतीय लष्कराला समर्पित आणि त्यांनी केलेल्या देशाच्या अथक सेवेला सलाम करत दुसर्‍या सिझनची घोषणा केली आहे.
 
हा दुसरा सिझन पहिल्यापेक्षा अधिक भव्य, उत्तम आणि सशक्त असेल. भारताच्या नंदनवन काश्मिरात, ही एका अशा स्त्रीच्या अथक शोधाची कहाणी आहे. जिला एका व्यक्तीचा शोध घ्यायचा आहे तोपर्यंत तिला शांतता लाभणार नाही, या अथक पाठपुराव्याची ही एक उत्कृष्ट कथा आहे, जी विश्वास, निष्ठा, हेरगिरी आणि गनिमी युद्धाची देखील कहाणी आहे.पहिल्या सिझनप्रमाणेच 'द टेस्ट केस 2' ही युद्धाच्या ठिकाणी युद्धाला तोंड देत ठामपणे उभी राहू शकणाऱ्या आणि शत्रूविरूद्ध कठोर कारवाई करणाऱ्या महिला अधिकाऱ्याच्या सक्षम प्रवासाभोवती फिरणारी कहाणी आहे. जी मिशनच्या अखेरीस कमकुवत पडणार नाही आणि मागेही हटणार नाही.
 
दुसर्‍या हंगामाच्या घोषणेने निश्चितच प्रेक्षकांमध्ये अपेक्षा, उत्सुकता आणि कुतूहल जागृत केले आहे, विशेषतः ज्यांनी पहिला हंगाम पाहिला आहे आणि या घोषणेसोबतच, दुसऱ्या सीझनच्या मुख्य भूमिकेत कोण असेल यासाठीच्या आघाडीच्या नायिकांच्या नावांचे अंदाज लावणे देखील सुरु झाले आहे. हा हंगाम भव्य आणि उत्तम होणार आहे, हे नक्की!
 
जागरनॉट प्रोडक्शन्स द्वारे निर्मित आणि सागर पंड्या द्वारे लिखित, 'द टेस्ट्स 2' च्या शूटिंगला लवकरच सुरूवात होणार आहे.