मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017 (09:50 IST)

‘१०२ नॉट आउट’मध्ये बच्चन आणि ऋषी कपूर एकत्र

amitabh bachhan

‘बिग बी’ अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांची जोडी तब्बल २६ वर्षानंतर एकत्र पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘१०२ नॉट आउट’ असून या चित्रपटाचे  चित्रीकरणही पूर्ण झाल्याचे अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करून ही महिती दिली आहे.

बच्चन यांनी  ट्वीटमध्ये लिहले आहे कि, माझी एक योजना संपली असून आताच ‘१०२ नॉट आउट’च्या शुटींगवरून परत आलो आहे. आणि आता पुढच्या प्रोजेक्टवर काम सुरु करणार आहे. या चित्रपटाला उमेश शुक्ला दिग्दर्शित करीत असून यामध्ये अमिताभ ‘१०२ वर्षाच्या व्यक्तीची भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच ऋषी कपूर बच्चन यांच्या ७५ वर्षीय मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे.