गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 (18:23 IST)

शिल्पा शेट्टीच्या नावावर एका वृद्ध महिलेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

शिल्पा शेट्टी बॉलीवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. शिल्पा तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच तिच्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत असते. आता अलीकडेच, अभिनेत्रीच्या नावावर सायबर गुन्हेगारांनी एका वृद्ध महिलेकडून 5.60 कोटी रुपयांची फसवणूक केली.पोलिसांनी ही घटना उघडकीस आणली.

ते शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करत आहेत. 
मिळालेल्या माहितीनुसार, फसवणुकांनी वृद्ध महिलेला 5.60 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने मुलाला हे सर्व सांगितले.मुलाने पोलिसांना ही माहिती दिली.

तो म्हणाला, 26 जुलै रोजी त्याच्या आईच्या फोनवर एका व्यक्तीचा व्हॉट्सॲप कॉल आला आणि त्याने स्वतःला मुंबई पोलीस अधिकारी म्हणून सांगितले. आणि महिलेचे संबंध राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीशी संबंधित मनी लेन्ड्रींग प्रकरणाशी आहे. तिच्या विरुद्ध एफआयआर करण्यात आली आहे. ही बाब कोणालाही सांगू नका असे ही तो म्हणाला. तिला त्याने पैसे जमा करायला सांगितले. महिलेने घाबरून पैसे जमा केले नंतर तिला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. 
Edited By - Priya Dixit