गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 27 मे 2022 (13:35 IST)

केंद्रीय मंत्री नारायण राणे रुग्णालयात दाखल

narayan rane
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लीलावती हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. ते मुंबईत होते. शुक्रवारी सकाळी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात येण्याची शक्यता आहे. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. ते रुटीन चेकअप साठी गेले असता त्यांना डॉक्टरांनी अँजियोग्राफीचा सल्ला दिला जातो. त्यानंतर त्यामध्ये काही ब्लॉकेज आढळून आले. म्हणून त्यांच्यावर आजच अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली असून ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.
शस्त्रक्रिये मध्ये ब्लॉकेजस हटवण्यासाठी एक स्टेन टाकण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना एक दोन दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात येईल.