मंगळवार, 25 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सोशल मिडीयावर अनुपम खेर यांच्या व्हिडिओची चर्चा

anupam kher video
अभिनेते अनुपम खेर सध्या चर्चेत आहेत. त्यांची प्रमुख भूमिका असलेला 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हा चित्रपट येत्या ११ जानेवारीला  प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झाला. त्यानंतर अनुपम खेर यांच्यावर सोशल मीडियावर सोमवारी एक व्हिडिओ त्यांच्या ट्विटर हॅंडलवरून शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी १०१ वर्षांच्या एका आज्जीचा उल्लेख केला आहे. या आज्जीबाई या वयात चहा विकण्याचा व्यवसाय करतात.
 
व्हिडिओ शेअर करून अनुपम खेर यांनी लिहिले आहे की, मी खजुराहोमध्ये हरबी देवींना भेटलो. त्या १०१ वर्षांच्या आहेत आणि आनंदी जीवन जगताहेत. इथल्या एका जुन्या झाडाखाली चहा विकण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. हरबी देवी खूप हिम्मतवान असल्याचेही ते व्हिडिओमध्ये सांगतात. हरबीदेवी यांनाही अनुपम खेर यांना भेटून मोठा आनंद झाल्याचे व्हिडिओमध्ये बघायला मिळते. एकूण १५ सेकंदांचा हा व्हिडिओ आहे.