बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 12 सप्टेंबर 2020 (18:40 IST)

काय सांगता, केबीसी मधून चक्क वगळली ही लाईफ लाइन

महानायक अमिताभ बच्चन कोरोनावर मात करून परत आपल्या कामावर रुजू झाले आहेत. दरम्यान, कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आणि त्यामुळे झालेल्या टाळेबंदी मुळे केबीसीच्या 12व्या पर्वाचे काम रखडलं होतं. त्या काळात अमिताभ यांनी घरातूनच केबीसीच्या नोंदणीचे आवाहन करणाऱ्या प्रोमोचं चित्रीकरण केलं होतं. 
 
त्यानंतर राज्य सरकार कडून मालिकांच्या चित्रीकरण करण्यासाठी परवानगी देण्यात आली असूनही 65 वर्षाहून अधिक असलेल्या कलाकारांच्या शूटिंग करण्यासाठी निर्बंध लावण्यात आले होते. त्या नंतर अमितजी यांना कोरोनाची लागण लागल्याने ते सुमारे 4 आठवडे नानावटी रुग्णालयात दाखल होते. 
 
नंतर ते बरे होऊन घरी परतले आणि आता उच्च न्यायालयाने देखील 65 वर्षावरील कलाकाराच्या शूटिंग साठी लावले असलेले निर्बंध देखील उठवले आहे. त्यामुळे अमिताभ याना केबीसीचे चित्रीकरण करणे सहज शक्य झाले आहे. त्यामुळे महानायक अमिताभ हे पुन्हा 'देवियो और सज्जनो... ' असे म्हणत कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर परतले आहे. 
 
दरम्यान, या शो मध्ये एक मोठा बदल करण्यात आला असल्याची बातमी येत आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्ववभूमीला बघून कोरोनाच्या नव्या नियमावलीनुसार कमी संचात चित्रीकरण करावं लागणार आहे. यंदा केबीसीच्या सेटवर प्रेक्षक नसणार. फक्त स्पर्धकांच्या नातेवाइकांनाच सेटवर येण्याची परवानगी असणार. त्यामुळे शो मधील जुनी लाईफ लाइन म्हणजे ऑडियन्स पोल वगळण्याचे समजले जात आहे. 
 
एखाद्या स्पर्धकाला प्रश्न अडल्यावर त्याचा मदतीसाठी तीन लाईफलाईन असायच्या. काळांतरात या लाईफ लाइन मध्ये देखील बरेच बदल करण्यात आले. पण ऑडियन्स पोल ही लाईफलाईन तशीच ठेवण्यात आली होती. त्यासाठी या लाईफ लाइन मध्ये तिथे असलेल्या प्रेक्षकांचा कौल घेतला जात होता. स्पर्धक त्यानुसार आपल्या उत्तराची निवड करीत असे. पण आता स्टुडियोमध्ये प्रेक्षक नसल्याने ही लाईफलाईन बाद करण्यात आली असल्याची चर्चा सुरू आहे. त्या लाईफलाईन च्या ऐवजी आता कोणती लाईफ लाइन येणार आणि केबीसीच्या नव्या पर्वा मध्ये अजून काय नवीन असणार या बाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.   
 
कोरोनावर मात करून केबीसीच्या चित्रीकरणासाठी परत आलेले बिग बी यांना अधिक काळजी घ्यावी लागणार असून, सुरक्षतेसाठी सर्व नियमांना काटेकोर पाळूनच चित्रीकरण केलं जात असल्याचे समजतं आहे.