शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 ऑगस्ट 2018 (09:12 IST)

संजूबाबाच्या आयुष्यावर आधारीत वेबसीरिज येणार

चित्रपटानंतर आता संजूबाबाच्या आयुष्यावर आधारीत वेबसीरिज येणार आहे. संजय दत्तच्या आयुष्यातील जे पैलू चित्रपटाच्या माध्यमातून उलगडू शकले नाही, ते सर्व वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
 
संजय दत्तवर वेबसीरिज बनवण्यासाठी एका आंतरराष्ट्रीय डिजीटल प्लॅटफॉर्मने संजय दत्त प्रोडक्शनशी संपर्क साधला आहे. त्यांना संजूबाबाच्या आयुष्यावर तीन भागांमध्ये वेब सीरिजची निर्मिती करायची आहे. ‘संजू’ चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी दाखवण्यात आल्या होत्या. परंतु, बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या त्यात दाखवल्या गेल्या नाहीत. या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर त्या सर्व गोष्टी आणण्याचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.