शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 12 जुलै 2021 (11:09 IST)

Bhuj Trailer: 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' चा ट्रेलर रिलीज

'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये देशभक्तीवरील संवादांनी भरलेला आहे. जबरदस्त एक्शन आणि फाइटर प्लेन सीन्स रोमांच निर्माण करतात.
 
अजय देवगनने आपल्या इन्स्टाग्रामवर ट्रेलर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'जेव्हा शौर्य आपली ढाल बनतं तेव्हा प्रत्येक पाऊल विजयाकडे वळतं. आतापर्यंत लढलेल्या सर्वात मोठ्या लढाईची कधी न ऐकलेली कहाणीचा अनुभव घ्या.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

या चित्रपटात अजय देवगण स्क्वॉड्रॉन लीडर विजय कर्णिकची भूमिका साकारणार आहे, ज्याला भारतीय हवाई दलाचे अधिकारी युद्धाच्या वेळी भुज विमानतळाची जबाबदारी देण्यात आली आहेत. स्थानिक लोकांच्या मदतीने तो हा संपूर्ण भाग पाकिस्तानी सैन्यापासून वाचवितो.
 
अजय देवगन व्यतिरिक्त संजय दत्त आणि शरद केळकरसुद्धा भक्कम भूमिकेत दिसले आहेत. ट्रेलरमध्ये सोनाक्षी सिन्हा छोट्या भूमिकेत आहे. त्यांच्याशिवाय नोरा फतेहीही एका वेगळ्या प्रकारची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.
 
'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' ही टी-सीरिज आणि अजय देवगण फिल्म्स संयुक्तपणे सादर करत आहे. या चित्रपटाचे निर्माता भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, गिन्नी खानुजा, वजीरसिंग आणि बन्नी संघवी आहे. अभिषेक दुधैया, रमण कुमार, रितेश शाह आणि पूजा भवोरिया यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे.
 
याचे दिग्दर्शन अभिषेक दुधैया यांनी केले असून हा चित्रपट 13 ऑगस्टला ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.