1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 जून 2021 (20:24 IST)

HSC Exam Cancelled: बारावीची परीक्षा रद्द केल्याची अधिकृत सूचना बोर्डाने दिली

HSC Exam Canceled: The Board has given an official notice to cancel the 12th standard examinationmaharashtra news regional marathi news
बारावीची परीक्षा रद्द करण्याची अधिकृत घोषणा बोर्डाकरून देण्यात आली असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या बाबत सविस्तर परिपत्रक जारी केले गेले आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थीना कोरोनाची लागण लागू नये या साठीं ही  परीक्षा रद्द करण्याचे स्पष्टीकरण या परिपत्रकेत देण्यात आले आहे.
 
नियोजनानुसार बारावी ची परीक्षा 23 ते 29 जून दरम्यान घेतली जाणार होती.केंद्र सरकारने कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकार ने देखील बारावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.   
 
बारावी बोर्डाच्या मूल्यमापन धोरण आणि निकालाची तारीख मंडळ लवकरात लवकर जाहीर करेल अशी माहिती राज्य शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
बारावी ही अत्यंत महत्त्वाची परीक्षा असून त्याच्या मूल्यमापनाचे एकसारखे सूत्र निश्चित केले जावे अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली. तसेच पर्यायी मूल्यमापनाच्या आधारावर निकाल जाहीर करावा असं देखील राज्य सरकार ने केंद्राला सुचविल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. 
इयत्ता 12 वी च्या परीक्षेते बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे उत्तीर्ण केले जावे . इयत्ता बारावीची परीक्षा रद्द केल्यामुळे, अंतर्गत मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीबाबत तसेच गुणपत्रक /प्रमाणपत्र देण्याबाबत स्वतंत्रपणे निर्देश निर्गमित केले जातील.