शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

रेखा झाली 63 वर्षांची!

'इन आँखों की मस्ती के मस्ताने हजारों है' असे 'उमराव जान'च्या मनमोहन रूपात गाणार्‍या रेखाचे आजही तितकेच मस्ताने आहेत. अजूनही रेखामध्ये 'खुबसुरत'ची चुलबुली कन्या आहे.

हृतिक रोशनच्या आजीच्या भूमिकेत जरी ती आता पडद्यावर दिसत असली तरी तमाम प्रेक्षकांसाठी आजही ती अमिताभसमोर 'सब कहते है मैने तुमको दिल दे दिया' गाणारी रेखाच आहे! वयाच्या हिशेबात रेखान आज (मंगळवारी) 63  वर्षांचा पल्ला गाठला. मात्र रेखाच्या उत्साहाला आणि सौंदर्याला कधी काळाचा निष्ठूर स्पर्श होईल असे वाटते का? दाक्षिणात्य सुपरस्टार जेमिनी गणेशन व पुष्पावली यांची कन्या म्हणून या भानुरेखाने 10 ऑक्टोबर ला जन्म घेतला. बरीच वर्षे आ‍पण रेखाचे पिता आहोत ही ओळख जेमिनी यांनी लपवली होती आणि त्याचे शल्य तिच्या मनात शेवटपर्यंत राहिले.

त्यामुळे चित्रपटसृष्टीत आल्यावरही तिने आपण 'गणेशन' आहोत याचा डंका पिटवला नाही. 'रंगुला रत्नम' या तेलगु चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केल्यावर 1970मध्ये रेखाने 'सावन भादो' चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यावेळेची काळी, गोलमटोल रेखा नंतर आमुलाग्र बदलली. सजा (1972), आलाप (1977), मुकद्दर का सिकंदर (1978), सिलसिला (1971), मेहंदी रंग लाएगी (1982), रास्ते प्यार के (1982), सौतन की बेटी (1989), यासारखे अनेक हिट चित्रपट तिने दिले. अमिताभ बच्चनच्या हिट चित्रपटांच्या यादीत हिरोईन म्हणून अनेक चित्रपटात रेखाच समाविष्ट आहे. आजही 'कैसी पहेली है जिंदगानी' म्हणत लडिवाळ चाळे करीत पडद्यावर येणारी रेखा तितकीच उत्साही वाटते.