संबंधित माहिती
- Kangana Ranaut Slap Case: कंगना थप्पड प्रकरणी कुलविंदर कौरवर कारवाई दोन कलमांखाली एफआयआर दाखल
- Yuvraj Singh: माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या घरी चोरीची मोठी घटना
- खड्ड्यात कारला धडक, मृत घोषित आजोबा झाले जिवंत
- Rakhi Sawant: गरिबीत गेले बालपण,त्यानंतर राखी बनली बॉलिवूडची ड्रामा क्वीन
- कांतारा चॅप्टर 1 च्या स्टार कास्टच्या बसचा अपघात,अनेक जण गंभीर जखमी
चंदिगडमध्ये गायक आणि रॅपर बादशाहच्या नाईट क्लबवर बॉम्ब हल्ला
Chandigarh News: चंदीगडमधील एका नाईट क्लबमध्ये मंगळवारी पहाटे दोन स्फोट झाल्याच्या वृत्ताने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच विशेष म्हणजे हा नाईटक्लब गायक आणि रॅपर बादशाहचा असून त्यांच्या क्लबमध्ये स्फोट झाल्याचे समजते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे स्फोट देशी बनावटीच्या बॉम्बने करण्यात आले. सध्या या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एनआयए पथकाला घटनास्थळी पाचारण करून तपास करण्याची तयारी सुरू आहे. स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक मोटारसायकलवर आले आणि त्यांनी चंदीगडच्या सेक्टर 26 मध्ये असलेल्या नाईट क्लबमध्ये स्फोटके फेकली, त्यानंतर तिथे स्फोट झाला. दुचाकीवरील संशयितांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहे दोन दुचाकीस्वार संशयित क्लबजवळ पोहोचले आणि त्यांनी देशी बॉम्बसारखे कमी शक्तीचे स्फोटक फेकून तेथे स्फोट घडवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. स्फोटाची माहिती मिळताच चंदीगड पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Edited By- Dhanashri Naik
