मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अजय देवगणला कॅन्स पीडित चाहत्याची विनंती, तंबाखूचा प्रचार करु नका

बॉलीवूड कलाकार अजय देवगण तंबाखूच्या ब्रांड्सची जाहिरात करताना दिसतात. परंतू अनेकदा त्यांना विरोध पत्कारावा लागतो. परंतू आता एका कॅन्सर पीडित व्यक्तीने अजय देवगणला तंबाखूचा प्रचार न करण्याची विनंती केली आहे. पीडित व्यक्तीने शहरात पर्चे लावून विनंती केली आहे.
 
राजस्थानच्या जयपूरमध्ये राहणार्‍या 40 वर्षीय नानकरामने अजयला तंबाखूच्या जाहिराती न करण्याची जाहीर विनंती केली आहे. नानकराम अजयचा फॅन आहे आणि अजयच्या जाहिरातीमुळे नानकरामला व्यसन जडले परंतू नंतर  त्याचे डोळे उघडले की तंबाखूचे सेवन करुन त्याने कुटुंबाचे आयुष्य उद्धवस्त केले कारण या दरम्यान त्याला कॅन्सरने गाठले.
पीडितच्या मुलाने सांगितले की त्याच्या वडिलांनी अजय जाहिरात करत असलेल्या ब्रांडची तंबाखू सेवन करणे सुरु केले परंतू तपासणी त्यांना कॅन्सर असल्याचे कळले म्हणून मोठ्या कलाकरांनी या प्रकाराच्या प्रॉडक्ट्सची जाहिरात करु नये. 
 
तंबाखूमुळे कॅन्सर झाल्याचे कळताच नानकरामने स्वखर्चाने तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम सांगणारी एक हजार माहितीपत्रके छापून ती सर्वत्र वाटली. यानंतर त्याने अजयला अशा पदार्थांची जाहिरात न करण्याची विनंती केली. नानकराम आता बोलू शकत नाही.